राज्यातील 'या' भागात गुरुवारपर्यंत अवकाळी व गारपीटीचे सावट

 

राज्यात गुरुवारपर्यंत अवकाळी व गारपीटीचे सावट मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातही गुरूवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी झाडांपासून दूर राहावं, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post