शरद पवारांच्या पथकाचे दूध संकलन केंद्रावर छापे, भेसळीच्या साहित्यासह दूध जप्त

 

दूध संकलन केंद्रावर छापे, भेसळीच्या साहित्यासह दूध जप्तदेवळाली प्रवरा (राजेंद्र उंडे ):राहुरी तालुक्यातील कोंढवड-शिलेगाव परीसरातील करपारवाडी येथील दोन दुध संकलन केंद्रावर अहमदनगर येथील अन्न औषध प्रशासनाचे सहाय्य आयुक्त एस.पी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी शरद पवार  यांच्या  पथकाने छापा मारुन दुधात भेसळ करताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन दुध संकलन केंद्रवरील 755 लिटर्स दुध व व्हे.पावडर असा एकुण 36 हजार 631 रुपयांचा साठा जप्त करुन भेसळयुक्त दुधाचे नमुने घेवून भेसळयुक्त दुध जागेवर नष्ट करण्यात आले.

                   राहुरी तालुक्यात सध्या दुध भेसळीचे प्रमाण वाढत चालले असल्याच्या तक्रारी अन्न औषध प्रशासनास प्राप्त झाल्याने अन्न औषध प्रशासन विभागाने दुध संकलन केंद्रावर छापे मारण्यास सुरवात केली आहे.बुधवारी सकाळी 7;30 वाजता कोंढवड-शिलेगाव परीसरातील दोन दुध संकलन केंद्रावर अचानक छापा मारुन दुध भेसळ करताना रंगेहाथ पकडण्यात आले.पशू वैद्यकीय  डाँ.दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या गोरक्षनाथ दुध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाने छापा मारुन दुध भेसळ करताना साहित्यासह रंगेहाथ पकडले.दुध भेसळीसाठी 100 लिटर दुध व व्हे.पावडरचे 40 लिटरचे द्रावण, व्हे.पावडर व दुध एकञित केलेले भेसळी साठीचे 300 लिटरचे द्रावण असा एकूण 24 हजार 931 रुपयांचा साठा जप्त केला आहे.

                 दुसरे दुध संकलन केंद्र रमेश पाटीलबा म्हसे यांच्या  म्हसे पाटील दुध संकलन केंद्रावर छापा टाकून  15 किलो व्हे.पावडर व 300 लिटर भेसळयुक्त दुध असा ऐकुण 11 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही दुध संकलन केंद्रावरील भेसळयुक्त दुधाचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दोन्ही दुध संकलन केंद्रावरील जप्त केलेले भेसळयुक्त दुध जागेवर नष्ट करण्यात आले. दोन्ही दुध संकलन केंद्राचे  700 ते 750 लिटर दुध संकलन होते.250 ते 300 लिटर भेसळयुक्त दुध तयार करुन दुध शितकरण केंद्रास 1000 लिटर दुध पुरवठा केला जात होता.

          अन्न औषध प्रशासनाच्या धडक कारवाई सहाय्यक आयुक्त एस.पी.शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप कुटे,शरद पवार, नमुना साहय्यक प्रसाद कसबेकर आदींनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post