विवाहित शिक्षिकेचा घरात घुसून विनयभंग, आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल

 विवाहित शिक्षिकेचा घरात घुसून विनयभंग, आरोपी विरूद्ध गुन्हा दाखलराहुरी (राजेंद्र उंंडेे) : राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या ओळखीच्या इसमाने घरात कोणी नसल्याचे पाहून विनयभंग केला या वरून राहुरी पोलिसात संतोष  धनवडे (राहणार जोगेश्वरी आखाडा) याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


तु मला फार आवडते असे म्हणुन विवाहित असलेल्या ३० वर्षिय शिक्षिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या वरून सदर तरुणीच्या फिर्यादीवरून संतोष  धनवडे याच्यावर गुन्हा रजि नंबर २४ ९ / २०२१ भादवी कलम ३५४ ब , ४५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post