माहिती अधिकारात माहिती दिली नाही.. 2 ग्रामसेवकांना दंड

माहिती अधिकारात माहिती दिली नाही.. 2 ग्रामसेवकांना दंड माहितीच्या अधिकारात माहिती मागून देखील माहिती न देणाऱ्या दोन ग्रामसेवकांना नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी कोपरगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना दंड ठोठावला आहे. त्यामध्ये ग्रामसेवक बी. एस. आंबरे यांना पाच हजार तर ग्रामसेवक सुभाष नवसु पवार यांना दहा हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती ॲड.योगेश खालकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोळपेवाडी येथील ग्रामपंचायतीत पाणी वितरण करणारा वाल्मीक महाळनोर याचा १९९० ते २०१७ या कालावधीत पगार कोणामार्फत दिला जातो. याची माहिती मिळावी, यासाठी स्थानिक महिला जनाबाई शिंदे यांनी १० एप्रिल २०१७ ला ग्रामपंचायातीत माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागविली होती. मात्र, त्या वेळचे ग्रामसेवक सुभाष नवसू पवार यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर बी. एस. आंबरे यांची ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी देखील माहिती दिली नाही. त्यामुळे जनाबाई शिंदे यांनी कोपरगाव येथील ॲड.योगेश खालकर यांच्यामार्फत माहिती न दिल्याने ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी, म्हणून अपील दाखल केले.

यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक के. एल. बिश्नोई यांनी ग्रामसेवकांचा खुलासा अमान्य करून तत्कालीन बी. एस. आंबरे यांना पाच हजार रुपये तर सुभाष पवार यांना दहा हजार रुपये दंड केला. ही दंडाची रक्कम दोघांच्या पगारामधून दोन महिन्यात कपात करण्यात यावी, असा आदेश कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post