पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार जाहीर...प्रा.राम शिंदे उमेदवार नसल्याचे स्पष्ट

 पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार जाहीरपंढरपूर :  राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.  सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशातच भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे. भाजप कडून माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. परंतु पक्षानं आवताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post