पोपटराव पवार यांच्यावर केंद्राकडून मोठी जबाबदारी, 'या' समितीवर निवड

 केंद्रीय वने व पर्यावरण समितीवर पोपटराव पवार यांची निवडनगर : केंद्रीय वने व पर्यावरण समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. समितीमार्फत पडजमीनी वनाचछादित करणे, जंगलतोड थांबविणे, पर्यांवरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे या कामांवर चालते नियंत्रण. पद्मश्री सन्मान मिळालेले पोपटराव पवार गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामविकासाच्या कार्यात सहभागी असून देश विदेशात ते ग्राम विकासाचे पथदर्शी मार्गदर्शन करत असतात. त्यांचे स्वतःचे हिवरे बाजार हे गाव ग्राम विकासाचे आदर्श मानले जाते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post