बोधेगाव दूरक्षेत्रावर नियुक्त पोलिस कर्मचारी संपत एकशिंगे यांचं अपघाती निधन
नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल संपत एकशिंगे यांचे आज मंगळवारी अपघाती निधन झाले. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी चौफुली येथे झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बोधेगाव दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोकॉ. संपत एकशिंगे हे आज मंगळवारी दुपारी बोधेगाव येथून पाथर्डीकडे दुचाकीवरून जात होते.ते पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी चौफुली येथून पाथर्डीकडे जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.बोधेगाव पोलिस दूरक्षेत्र येथे कार्यरत असतांना त्यांनी गोरगरिब व सर्वसामान्य जनतेची कामे त्यांनी केली. एखादा वाद पोलिस ठाण्यात आला तर तो तेथेच मिटवून शांतता व सलोखा राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाचे वृत्त बोधेगाव व परिसरात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment