संजय राठोड यांचा राजीनामा योग्य, धनंजय मुंडे यांनीही स्वतःहून भूमिका घ्यावी

 धनंजय मुंडे यांनी स्वताहून भूमिका घ्यायला हवी: पंकजा मुंडेमुंबई: पूजा चव्हाण फ्रकरणावरून राजकारण करणं योग्य नाही, पूजा प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी. पक्षाने किंवा महिला मोर्चाने जी मागणी केली, त्यानंतर सरकारवर दबाव आला. त्यामुळे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांनीही स्वताहून भूमिका घ्यायला हवी असं मत व्यक्त केले आहे.

मुंडे म्हणाल्या की,  अशाप्रकारे कुणावर बोट दाखवलं गेलं असेल तर त्यांनी स्वत: निर्णय घ्यावा. राजकारणात जे पायंडे सुरु आहेत ते महिलांच्या दृष्टीनं चुकीचे आहेत. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता, राजीनामा दिला पाहिजे की नाही त्यांच्या पक्षानं ठरवावं, आमच्या पक्षाची तर मागणीच आहे राजीनामा द्यावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post