केंद्राच्या 'या' योजनेतून शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रूपयांची पेन्शन

 प्रधानमंत्री किसान मानधन योजनानवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान मान धन योजने  अंतर्गत 60 वर्षे वयाच्या पात्र शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते. म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याचं वय 60 वर्षे असेल तर त्याला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत वर्षाला मिळणाऱ्या 6000 रुपयांच्याव्यतिरिक्त दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. प्रधानमंत्री किसान मान धन योजना ही अल्प आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना आहे, ज्यांची 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती योग्य आहे. त्यांना याचा लाभ मिळू शकतो. 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेंतर्गत नोंदणी करण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत, शेतकऱ्याला 60 वर्षांचे झाल्यावर दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post