ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही घेतली लस

 शरद पवार यांनी घेतली करोना प्रतिबंधक लसमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी करोनाची लस टोचून घेतली.  मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात त्यांनी ही लस घेतली. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या.  याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post