मोठी बातमी... 'या' कारणासाठी परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

 परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करावीमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रा लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप सिंग यांनी केलाय. या पत्रावरुन आता सत्ताधाऱ्यांनी सिंग यांच्यावर उलट आरोप करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत आता सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post