माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली राज्यपालांची भेट, केली 'ही' मागणी

बीड जिल्हा सहकारी बँकेची निवडणुकीच्या मुद्यावर पंकजा मुंडे राज्यपालांच्या भेटीलामुंबई- बीड जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक रोखण्यात आली आहे. कोरोनाच्या नावाखाली बँकेवर प्रशासक नेमण्याचा डाव आखला जात आहे. राज्यपाल या प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात आल्याचं भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मुंडे यांच्या सह शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

 औरंगाबादमध्ये निवडणूक घ्यायला परवानगी मिळते मग बीड जिल्ह्यातच परवानगी का नाही? असा सवालही मुंडे यांनी विचारला आहे. बीड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद करून निवडणूक लढण्यास रोख लावला आहे म्हणून निवेदन दिले.  औरंगाबाद व इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला तो बीड ला नाही हे दुर्दैवी सत्ताधाऱ्यांनी बॅंक बरखास्ती चे कारस्थान रचले आहे.

ही बँक बुडीत निघाली होती. आम्ही साडेपाचशे कोटीला ही बँक नफ्यात आणली. शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बँक आहे. ही बँक बरखास्त करण्याचं षडयंत्र सुरू आहे. या बँकेची निवडणूक व्हावी म्हणून आम्ही सहकार मंत्र्यांशी बोललो आहे. निवडणुका घ्यायच्या की नाही हे सहकार मंत्र्यांच्या हातात आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतला तर निवडणुका होतील. ते दबावात आहेत का? हेच कळत नाही. सहकार मंत्र्यांनी योग्य निर्णय दिला नाही तर कोर्टात दाद मागू, असंही त्या म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post