माजी मंत्री प्रा.राम शिंदे विधानसभेत पुन्हा येणार? पंढरपूर मधून उमेदवारी द्यावी

पंढरपूरमधून माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी द्यावीसोलापूर :  पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने  प्रदेश उपाध्यक्ष व धनगर समाजाचे नेते व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर शैक्षिक संघाचे सचिव व भाजपा प्रज्ञावंत आघाडीचे माजी प्रमुख प्रा. देवेंद्र मदने यानी केली.

 या पोट निवडणूकीत प्रस्थापति पक्षाने धनगर समाजाला उमेदवारी द्यावी अशी धनगर समाजाची एक मुख्य मागणी वर्तमानपत्रातून व सामाजिक माध्यमातून होत आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा जामखेड मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे व राज्याचे माजी जल संधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी द्यावी. प्रा. राम शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. धनगर समाजाचे मेळावे घेऊन धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले.


प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण झाले. अहिल्यादेवी अध्यासन केंद्रास मंजूरी मिळाली. त्याच बरोबर सर्व समाजात त्यांचे कार्य आहे. तरी सोलापूर व शहर जिल्ह्यातील प्रा. दत्ता डांगे, डॉ. तानाजी कोळेकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, मंगळवेढ्यातील डॉ. दादासाहेब खांडेकर, धनगर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सिद्धारूढ बेडगनूर यांनी प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी दिली अशी मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post