गोपीचंद पडळकर पुन्हा आक्रमक, १६ मार्चला करणार पुतळा अनावरण

 

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने आम्हीच अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करणारमुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी  16 मार्चला औंढा नागनाथ  येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पडळकर यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ नसल्याने धनगर बांधवच पुतळा अनावरण करतील असे जाहीर करीत सरकारला आव्हान दिले आहे.   येत्या 16 मार्चला औंढा नागनाथ येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण आम्ही करणार आहोत. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना यासाठी वेळ नाही. माझं कुटुंब माझी जबाबदार यातून मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने येत्या 16 तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत,” असे पडळकर यांनी म्हटलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post