...तर नगरचा पुढील आमदार, महापौर काँग्रेसचा असेल : ना.बाळासाहेब थोरात

 ....वेळप्रसंगी नगर शहराचा आमदार, महापौर काँग्रेसचा असेल - ना. बाळासाहेब थोरात 



प्रतिनिधी : काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.  किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. 

शहर जिल्हा काँग्रेची  संघटनात्मक आढावा बैठक ना. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. 

यावेळी बोलताना ना.थोरात म्हणाले की संघटनात्मक फेरबदल करत असताना नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या रूपाने नवीन दमाचा चेहरा पक्षाने दिला आहे. शहरामध्ये काँग्रेस जोमाने काम करत आहे. मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद काळे यांच्या पाठीशी उभी केली जाईल. 

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी असिर सर यांच्या नंतर नगर शहरामध्ये विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीने जाण्याची क्षमता असणारा चेहरा म्हणून किरण काळे यांच्याकडे नगर शहर पाहत आहे असे नमूद केले. त्याचा धागा पकडत ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं तर ही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे काळे यांचे भवितव्य उज्वल आहे. 

यावेळी बोलताना किरण काळे यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोरच महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी अभद्र युतीवर सडकून टीका केली. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्रपक्ष वागत आहे. काँग्रेस शहरामध्ये त्यामुळे विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.  

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, राजेंद्र नागवडे, संपतराव म्हस्के, फारुख शेख, अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, जरीना पठाण, उषा भगत, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, सेवादल अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, नलिनी गायकवाड, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, सुमन कालापहाड, शबाना शेख, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post