आश्चर्य.... ५ वर्षात पेट्रोल-डिझेलचा एक थेंब सुध्दा विकत न घेणारे प्रा. डॉ.युवराज भोसले

 गेल्या पाच वर्षात पेट्रोल-डिझेलचा एक थेंब सुध्दा विकत न घेणारे प्राध्यापक डॉ.युवराज भोसले डॉ.युवराज भोसले  सध्या मुंबई स्थित टोपीवाला राष्ट्रिय वैद्यकिय महाविद्यालयात प्रध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. व गेल्या 5 वर्षा पासुन त्यांनी पेट्रोल वा डिझलचा एक थेंब विकत घेतला नाही व वापरला नाही. त्या ऐवजी ते पर्यावरण पुरक साधने उदा. सायकल,इलेकट्रिक व्हेईकल,सार्वजनिक वाहन व्यवस्था ई. चा वापर करतात. के.ई.एम. (King Edward Memorial Hospital) मध्ये कार्यरत असतांना तेथुन ते योग साधना व सामाजिक कामाकरीता गिरगावला येताना पहिले सायकलने प्रभादेवी (एलफिस्टन रेल्वे स्टेशन) वर येत ती सायकल पार्कींग मध्ये ठेवुन लोकल रेल्वेने ग्रान्ट रोड रेल्वे स्टेशन गाठत तिथे ते दुसरी सायकल पार्कींग मध्ये सदैव (24 तास) उभी ठेवत तीचा वापर करुन गिरगाव चौपाटी गाठत. घरी परत जाताना पुन्हा याच क्रमाने दैनंदिन एकुण सुमारे 24 कि.मी. चा प्रवास ते पेट्रोल / डिजल चा वापर न करता पुर्ण करत असत.

सध्या त्यांनी इलेकट्रिकवर चालणारे वाहान घेतले असुन नजिकच्या स्थळावर व शहरातील प्रवासाकरीता ते इलेकट्रिक ने चालणाऱ्या वाहनाचा वा सायकलचा वापर करतात. दुरच्या प्रवासा करीता सार्वजनिक वाहन व्यवस्था उदा.रेल्वे,बस यांचा वापर करतात.

मुंबई सारख्या व्यस्त व गजबजलेल्या शहरात राहुन सुध्या गेल्या पाच वार्षापेक्षा जास्त काळापासुन पेट्रोल-डिजलचा एक थेंब सुध्दा विकत न घेता पर्यावराणाचा समतोल राखण्याच्या प्रयत्नाने त्यांनी त्यांची जवाबदारी ओळखली आहे.

सौजन्य: फेसबुक


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post