नगरकरांनो सावधान...मास्क नसल्यास आता ५०० रुपये दंड
नगरकरांनो सावधान...मास्क नसल्यास आता ५०० रुपये दंडनगर : नगर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. उन्हाळ्यात बहुतांश ठिकाणी यात्रा, जत्रा असतात. यासाठीही गर्दी न करण्याचे आदेश आहेत. तसेच अशा सर्वच ठिकाणी विनामास्क फिरणार्‍यांची संख्याही मोठी आहे. नगर शहरातही सायंकाळनंतर चौकाचौकात कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. 

मास्क न वापरल्यास आता शंभर ऐवजी पाचशे रूपये दंड ठोठावण्यात येणार आहे. एक मार्चपासून दंडाचे दर वाढविण्यात आल्याने मास्क न वापरणार्‍यांना चांगलाच आर्थिक भूर्दंड पडणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत. पोलीस नाईकापासून ते अधिकार्‍यांपर्यंत सर्वांना दंड वसुलीचे व कारवाईचे अधिकार यापूर्वीच दिलेले आहेत. ते 28 फेब्रुवारीपर्यंत होते. त्यात वाढ करण्यात आली असून, 31 मार्चपर्यंत हे अधिकार अबाधित ठेवले आहेत. यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान करणे यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. 
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post