...तर राष्ट्रवादीचे 'हे' नेते होऊ शकतात गृहमंत्री

गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चामुंबई :  आयपीएस अधिकारी परमबीर सिंग  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणावरून  विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला घेरले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा अटळ मानला जात आहे. तसा बदल झाल्यास गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी कडून दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या कामगार आणि उत्पादन शुल्क विभाग आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post