नाशिकसह जळगाव जिल्ह्यात निर्बंध कडक

 नाशिकसह जळगाव जिल्ह्यात निर्बंध कडक मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोनाचा कहर वाढत आहे.  राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. त्यात बुलडाणा, जळगाव आणि नाशिक जिल्हा प्रशासनानं काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

जळगाव जिल्ह्यात 3 दिवस जनता कर्फ्यू

जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा 3 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या 3 दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद राहणार आहेत.

बुलाडाण्यात टाळेबंदी कायम

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.जिल्ह्यात 16 मार्चपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


नाशिकमध्ये शनिवार, रविवारी बाजारपेठा बंद

नाशिकमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post