करोना संसर्ग...देशातील टॉप टेन जिल्ह्यात नगरचा समावेश

 सर्वाधिक करोना संसर्ग असलेल्या देशातील टॉप टेन जिल्ह्यात नगरचा समावेशनवी दिल्लीः देशात करोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहीमेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज माहिती दिली. देशात प्रामुख्याने १० जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहर यांचा यात समावेश आहे. आठवड्याचा राष्ट्रीय सरासरीचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६५ टक्के आहे. यात महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी २३ टक्के, पंजाबची ८.८२ टक्के, छत्तीसगड ८ टक्के, मध्य प्रदेशचा ७.८२ टक्के, तामिळनाडू २.५० टक्के, कर्नाटकचा २.४५ टक्के, गुजरातचा २.२ टक्के आणि दिल्लीचा २.०४ टक्के इतका आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post