चिडलेल्या बापाने केला स्वतःच्याच मुलीचा खून

 मुलीचा विवाहास नकार, चिडलेल्या बापाने केला स्वतःच्याच मुलीचा खूनसांगली : मुलगी विवाहास तयार होत नसल्याच्या कारणावरुन चिडलेल्या बापाने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेनंतर मुलीच्या बापाने गुपचूप तिचा अंत्यविधीही उरकला. मात्र प्रेत अर्धवट जळाल्यामुळे ते पुन्हा दफन करण्यात आले. हा सर्व धक्कादायक प्रकार सांगलीतील आटपाडी या ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. 

सांगलीच्या आटपाडी येथे बनपुरी येथे पूर्वेला चौगुले वस्तीवर उत्तम चौगुले नावाचे गृहस्थ राहत होते. उत्तम चौगुले यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक स्थळ आलं होते. पण या लग्नाला मुलीचा नकार होता. ती आता लग्न नको, असे वारंवार घरात सांगत होती. यावरुन शनिवारी 13 मार्चला वडील आणि मुलीमध्ये टोकाचा वाद झाला.

या वादातून तिच्या वडिलांनी त्या मुलीला बेडग्याने बेदम मारहाण केली. यावेळी डोक्‍यावर घाव बसल्यामुळे मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी घरात स्वच्छता केली.

त्यानंतर शेजाऱ्यांसमोर मुलीचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यावेळी अनेकांना ही घटना संशयास्पद वाटली. यानंतर आरोपी उत्तम चौगुले याने इतर चौघांना सोबत घेऊन घराशेजारीच असलेल्या ओढापात्राजवळ मध्यरात्री तिचा अंत्यविधी उरकला. मात्र तिचे प्रेत अर्धवट जळल्यामुळे त्याने ते ओढा पात्रातच दफन केले.

मात्र या घटनेनंतर गावात उलटसुलट चर्चा सुरु होती. आठ दिवसांनंतर हा सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी संशयित आरोपी उत्तम चौगुले याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताचा त्याने स्वत:च्या मुलीचा खून केल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post