वाढदिवसाला 'या' गोष्टी स्विकारणार नाही, आ.निलेश लंके यांचे आवाहन

 


नगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा १० मार्च रोजी वाढदिवस असून शुभेच्छा म्हणून हारतुरे वगैरे गोष्टी आणल्यास स्विकारणार नाही असे आ.लंके यांनी स्पष्ट केले आहे. याऐवजी गरजूंसाठी शालेय साहित्यासारखी मदत करावी असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केलं आहे.


सर्वांना नम्र पूर्वक विनंती करण्यात येते की,बुधवार दि.१० मार्च रोजी माझा वाढदिवस येत आहे.सदर दिवशी आपण समाज उपयोगी काम करून माझ्या माय-बाप जनतेला जे अपेक्षित असे काम करा.कोणी हार,तुरे,बुके,केक व शाल काही आणू नये.त्याऐवजी गोरगरिबांसाठी समाज उपयोगी वस्तू द्या वह्या,पुस्तके,कंपास पेटी,दप्तर,चप्पल जोड, गरिबांसाठी कपडे,रूग्णांना वैद्यकीय मदत,वृद्धांना काठी वाटप करा,वैद्यकीय कॅम्पचे आयोजन करा व गरीब विद्यार्थी यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत,दिव्यांग बांधवांना मदत, गरीब विद्यार्थी यांना शिक्षणासाठी दत्तक घ्या.पुन्हा एकदा आपणा सर्वांना नम्र पूर्वक विनंती करतो की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे हार,तुरे,बुके,शाल,केक व श्रीफळ स्वीकारणार नाही,गरीब बांधवांना मदत करा हाच माझा सत्कार व सन्मान मी समजेल.


                            आपलाच जनसेवक

                       आमदार निलेश ज्ञानदेव लंके

                   पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post