आ.संग्राम जगताप यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन, केली महत्त्वपूर्ण मागणी

मनपाच्या गाळेधारकांना भाड्यात सवलत मिळावी, आ.संग्राम जगताप यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
मुंबई: आमदार संग्राम जगताप यांनी आज मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अहमदनगर महानगरपालिकेच्या गाळेधारकांना भाड्यात दिलासा देऊन भाडे कमी करण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिले. करोना काळात व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे गाळेधारकांनी या काळातील भांड्यात सवलत देण्याची मागणी नुकतीच मनपाकडे केली. याबाबत आ.जगताप यांनी थेट शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post