रूग्णांना दिलासा देण्यासाठी आमदार थेट कोविड ‌वार्डात, रूग्णाबरोबर विनामास्क सेल्फी

 रूग्णांना दिलासा देण्यासाठी आमदार थेट कोविड ‌वार्डात, रूग्णांबरोबर विनामास्क सेल्फीपारनेर: ‘मी जबाबदार! माझा मास्क माझी सुरक्षा,’ असे सांगत खुद्द मुख्यमंत्री आणि राज्य सरकार नागरिकांना मास्क वापरासंबधी प्रबोधन करीत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना प्रशासनाकडून दंड केला जात आहे. असे असूनही पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी मात्र रुग्णालयात उपचार सुर असलेल्या रुग्णांची कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. ‘मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे" असे सांगत लंके यांनी ही भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घातल्याचे दिसून येते.

पारनेर तालुक्यातील सुपे येथील एका खासगी कोरोना रुग्णालयास आमदार लंके यांनी भेट दिली. गेल्या वेळीही करोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी लंके यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले होते. सर्वांत मोठे कोविड सेंटरही त्यांनी सुरू केले. रुग्णांना दिलासा दिला. आता पुन्हा त्यांनी हेच काम सुरू केले आहे, या गोष्टी खऱ्या असल्या तरी रुग्णांप्रती काळजी असल्याचे दाखविताना त्यांनी आपल्याच सरकारने घालून दिलेल्या नियमांचा मात्र भंग केल्याचे दिसते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post