नगरमध्ये मनपाच्या 'या' केंद्रावर रॅपिड ॲंटीजेन टेस्ट व स्वॅब कलेक्शनची व्यवस्था

 करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग महत्वाच्या : बाबासाहेब वाकळे

बीजेएस व फोर्स मोटर्सचे नगरमध्ये पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर अभियान, मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था


नगर: राज्यासह नगरमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग व बाधित रूग्णांचे विलीगीकरण आवश्यक आहे. भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महापालिकेने करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर अभियान सुरू केले आहे. यात महापालिकेच्या केंद्रांवर मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमातून रूग्णांचे निदान लवकर होऊन करोना लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
बीजेएस व फोर्स मोटर्सने नगर शहरात पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत बुरुडगाव रोडवरील जिजामाता दवाखान्यात मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे,  स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले, नगरसेविका मीनाताई चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, अजय ढोणे मनपा उपायुक्त डॉ.पठारे, यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिजामाता आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ.आएशा शेख, सिस्टर खिलारी, योगेश तांबे, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, बीजेएसचे शहराध्यक्ष प्रशांत गांधी, गिरीश अग्रवाल, महेश गुंदेचा, महेश गुगळे, संतोष कासवा, नितीन शिंगवी, रोशन चोरडिया, खिलारी सिस्टर, बीजेएसचे टेक्निशियन प्रतिक्षा जगदाळे, किर्ती नवले, प्रतिक जगदाळे, अशोक वनवे, ज्ञानेश्वर वायभासे, अक्षता शर्मा, अक्षय कानडे, बाबासाहेब गिते, अतुल वैरागर आदी उपस्थित होते. मर्चंटस्‌ बँकेचे संचालक तथा माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. तर मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी या टेस्ट सुरु करण्यासाठी बीजेएसकडे पाठपुरावा केला.
सभापती अविनाश घुले म्हणाले की, मागील वर्षी करोना महामारीचे आगमन झाल्यापासून बीजेएसने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुरूवातीच्या काळात मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन सूरू करून शहरात नगरसेवकांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागात जाऊन आरोग्य तपासणी करीत संशयित रुग्णांच्या विलीगीकरणास मदत केली. याशिवाय लॉकडाऊन काळात विविध हॉस्पिटलला ऑक्सिजन युनिट देणे, मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था, गरजूंच्या जेवणाची व्यवस्था, करोना योद्ध्यांना मास्क, सॅनिटाजरचा पुरवठा अशी अनेक कामे बीजेएसने केली. आदेश चंगेडिया व त्यांची टिम अक्षरशः झपाटून काम करीत असल्याचे पहायला मिळाले. नगरसेविका मिनाताई चोपडा म्हणाल्या की, भारतीय जैन संघटनेने करोना काळात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. जिथे जिथे मदतीची आवश्यकता असेल तिथे बीजेएसची टिम धावून जाते. हे काम आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, मागील वर्षी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने नगरमध्ये मिशन झिरो अहमदनगरची सुरुवात करण्यात आली होती. आता नव्याने हे मिशन हाती घेण्यात आले आहे. सध्या टेस्टिंगचे प्रमाण वाढले असले तरी रिपोर्ट येण्यास तीन चार दिवस लागतात. मधल्या काळात संशयित रुग्ण सगळ्यांमध्ये मिसळत असल्याने संसर्ग वेगानं वाढत आहे. आरटीपीसीआर टेस्ट महत्वाची असली तरी  रॅपिड अँटीजेन टेस्टने लवकर निदान होत असल्याने पॉझिटिव्ह रूग्णाचे लवकर विलीनीकरण करणे शक्य होते. लक्षणं असूनही रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधिताला आरटीपीसीआर टेस्टसाठी पाठवलं जातं. यासाठी मनपाने स्वॅब संकलन केंद्रही सुरू केले आहे. बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये मनपाच्या जिजामाता दवाखान्यासह केडगावला संदीप हॉटेलसमोरील मनपाचे आरोग्य केंद्र येथे रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था असून लवकरच सावेडी व नागापूर येथेही सदर केंद्र सुरू करत आहोत.  
शहराध्यक्ष प्रशांत गांधी यांनी सांगितले की, येत्या काळात या टेस्टसाठी मोठ्या प्रमाणात किट उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांनी लक्षणं आढळल्यास किंवा करोना रूग्णाच्या संपर्कात आल्यास न घाबरता या केंद्रावर येऊन टेस्ट करून घ्यावी. ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्री नुसार आपण मिशन झिरो अहमदनगर अभियान यशस्वी करू असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post