'या'पाणी योजनेसाठी अक्षय कर्डिले उतरणार रस्त्यावर, राज्यमंत्री तनपुरे यांच्यावर घणाघाती टीका

 वीजबिलोपाटी २५ दिवसांपासून पाणी योजना बंद ; ऊर्जा राज्यमंत्र्यांचा प्रताप

तिसगाव पाणी योजना २४ तासात सुरु करा अन्यथा पांढरी पूल येथे जनआंदोलन : अक्षय कर्डिलेनगर : महाविकास आघाडीच्या कारभाराला जनता आता पूर्णपणे वैतागली आहे. जनतेचे कुठलेही प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. त्यांचे एक एक कारनामे आता बाहेर येत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी यांच्याजवळ वेळ नाही.
गेल्या १ वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले असून त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. भर उन्हाळ्यामध्ये या सरकारने तिसगाव पाणी योजनेच्या नगर तालुका व पाथर्डी तालुक्‍यातील २९ गावांचा पाणीपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून बंद केला आहे. या मतदान संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे हे ऊर्जा राज्यमंत्री असतानाही नागरिकांवर पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. मंत्र्यांना जनतेच्या प्रश्नाची कुठलीही जाण नसल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून राहुरी मतदारसंघातील जनता यांना वैतागली आहे. जनतेला पाणी देऊ शकत नसणारे मंत्री काय कामाचे? असा सवाल नागरिकांमधून होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांचे पिण्याचे पाणी बंद करणे हे धोरण योग्य नाही. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले या मतदारसंघाचे १0 वर्षे प्रतिनिधीत्व करीत असताना एकदाही वीजबिलोपाटी ही योजना बंद झाली नाही. तिसगाव पाणी योजना येत्या २४ तासात सुरु न
केल्यास पांढरीचा पूल येथे पाण्यासाठी जनआंदोलन करु, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post