गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेनगर : काल नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यात सायंकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नियोजित पाथर्डी दौरा रद्द करून नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडी , गाडकवाडी , म्हैसगाव, कोळेवाडी आणि इतर काही गावांमध्ये शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी करत तनपुरे यांनी त्यांना दिलासा दिला. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल बनविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.शेतकऱ्यांना या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पूर्ण प्रयत्न केले जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post