नगर शेजारील 'या'शहरात लॉकडाऊन, मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज टोटल बंद

 औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन... मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज टोटल बंद



औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या 11 मार्चपासून औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन याबाबत नुकतंच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या लॉकडाऊनसाठी लवकरच नवी नियमावली जारी केली जाणार आहे. यानुसार राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही.

रात्री 9 पर्यंत हॉटेल सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री 11 पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post