शेवगावच्या पल्लवी मेहेर 'सीआयडी'त पोलिस उपअधीक्षक, जैन समाजातील पहिल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी

 शेवगावच्या पल्लवी मेहेर 'सीआयडी'त पोलिस उपअधीक्षक, जैन समाजातील पहिल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी



नगर : शेवगाव येथील सौ.पल्लवी रोहित मेहेर यांची पोलीस उपअधिक्षक पदी पदोन्नती होऊन गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे येथे नियुक्ती झाली आहे.

जैन समाजातील महिलेने पोलीस खात्यात महत्वाचे पद मिळवणे ही समाजाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असून महाराष्ट्रात ही जैन समाजातील पहिली महिला आहे, असे जैन संघटनेचे तारुशेठ भंडारी व विलास गांधी यांनी सांगितले.

सौ. मेहेर या येथील प्रसिध्द व्यापारी तखतशेठ मेहेर यांच्या स्नुषा व चार्टर्ड अकौंटंट रोहित मेहेर यांच्या पत्नी आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे आ. मोनिका राजळे, माजी आ. चंद्रशेखर घुले, विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post