Breaking...लग्न समारंभ, रेस्टॉरंट बाबत जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय, शाळा चालू की बंद बाबतही तीन दिवसांत निर्णय... Video

 जिल्ह्यातील लग्न समारंभ, रेस्टॉरंट बाबत जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय, शाळांबाबतही तीन दिवसांत निर्णय होणारनगर(सचिन कलमदाणे) : नगर जिल्ह्यातील करोना परिस्थिती गंभीर होत चालली असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील लग्न समारंभ व रेस्टॉरंट मधील गर्दी बाबत कडक पावलं उचलण्याची तयारी चालविली आहे. येत्या काळात लग्न समारंभ असलेल्या ठिकाणी पोलिस नियुक्त केले जाणार असून चित्रीकरणही केलं जाणार आहे. याशिवाय हॉटेलचीही अचानक छापे टाकून तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील शाळा, कॉलेज बाबत येत्या तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post