सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर...LTC घ्या नवीन नियमामुळे मिळणार लाभ

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर...LTC घ्या नवीन नियमामुळे मिळणार लाभनवी दिल्ली : केंद्रासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात लिव ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजेच एलटीसी वाया गेला. लॉकडाऊन आणि नंतर कोरोनाच्या भीतीमुळे लोकांचं बाहेर फिरणं झालं नाही, आणि त्यामुळे एलटीसीचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता आला नाही. मात्र केंद्र सरकारने एलटीसीचे नवे नियम जाहीर केले आहेत.

एलटीसी म्हणजेच Leave Travel Concession ही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी सुविधा आहे. या स्कीम अंतर्गत ४ वर्षात कर्मचाऱ्यांना दोनदा फिरण्याचे पैसे सरकारतर्फे दिले जातात. कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे वर्गवारी केलेली असते. मात्र गेल्या वर्षी एलटीसी न मिळाल्याने सरकारी कर्मचाऱी निराश झालेले. त्यामुळेच कर्मचाऱ्यांसाठी एलटीसी कॅश वाऊचर स्कीम आणि आता तर एलटीसी स्कीममध्येच कोरोना काळात काढलेला जीवन विमा क्लेम करता येणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post