गुड न्यूज... कृषी विभागातील रिक्त पदासाठी लवकरच भरती

 कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणार – कृषिमंत्री दादाजी भुसेमुंबई दि. 2 :- कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य गिरीशचन्द्र व्यास यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण 27 हजार 502  पदांचा आकृतीबंध मंजूर असून त्यापैकी 18 हजार 622 पदे भरलेली आहेत तर 8 हजार 880 पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक संवर्गाची 20  हजार 181 पदे मंजूर असून त्यापैकी 14 हजार 809 पदे भरलेली आहेत तर 5  हजार 372 पदे रिक्त आहेत. 16 मे 2018 शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील 100 टक्के  पद भरतीस मान्यता देण्यात आली होती.त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर वित्त विभागाच्या 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत, अशीही माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे  व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य गिरीशचन्द्र व्यास, नागोराव गाणार आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post