कोल्हापुरात मद्यधुंद पोलिस कर्मचाऱ्यांची पोलीस उपअधीक्षकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ
कोल्हापुरात मद्यधुंद पोलिसांची पोलीस उपअधीक्षक यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केेेेल्याची घटना समोर आली आहे.
कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात दोन पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल.
महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी शनिवारी रात्री कसबा बावडा परिसरात उघड्यावर करत होते मद्यप्राशन,
उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांना हटकले असता वादावादीला सुरुवात झाली.
मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
या प्रकरणी बळवंत पाटील, राजकुमार साळुंखे आणि जितेंद्र देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment