सत्ता गेल्यापासून फडणवीसांचा चेहरा अस्वस्थ दिसतो, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा टोला.. Video

 सत्ता गेल्यापासून फडणवीसांचा चेहरा अस्वस्थ दिसतो, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा टोलानगर ः राज्यात हे जे काही चाललं आहे ते कोण आणि कशासाठी करतेय हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यांच्या खटपटी, लटपटी सगळे जाणून आहेत. विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार अस्थिर करायचं. परंतु काहीही केलं तरी जमत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

खडसे यांनी नगर भेटीत  माजी खासदार कै. दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन ‌केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आपल्या जवळचे आमदार फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी काही संभ्रम निर्माण करायचा. सरकारवर आरोप करायचे, यात भाजप माहीर आहे. सत्ता गेल्यापासून तुम्ही फडणवीस यांचा चेहरा पाहिलाय का, सत्तेत असताना आणि आता सत्तेबाहेर असताना कसे दिसतात, हे तुम्ही पाहिलंय का.गेली तीस वर्षे मी विरोधी पक्षात काढली आहेत. विरोधी पक्षाला सरकारविरोधात आरोप करावेच लागतात. तसे हे सुरू आहे. माझं असंही म्हणणं नाही की भ्रष्टाचार पाठिशी घातला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केलं.

Video by- विक्रम बनकर
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post