जनधन खात्याचे लाभ हवे तर तातडीने 'ही' गोष्ट करा

जनधन खात्याचे लाभ हवे तर आधार लिंक  करानवी दिल्ली: तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडले आहे का? जर खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सर्व खात्यांना 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे तुमच्या जनधन अकाउंटला आधार लिंक करून घ्या. नाहीतर जनधन खात्याचे कुठलेच फायदे तुम्हाला मिळू शकणार नाहीत.


देशांमध्ये 41 कोटी जनता ही प्रधानमंत्री जनधन योजनेची लाभार्थी आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेतील जनधन खात्यांची संख्या 41 कोटी 75 लाख इतकी आहे. सन 2014 मध्ये स्वातंत्र्य दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी या योजनेला सुरुवात झाली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात लोकांनी बँकेमध्ये खाते उघडले. 


या योजनेअंतर्गत खाते धारकास 2. 30 लाखांचा विमा मिळतो. जनधन खाते धारकास ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रूपे डेबिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते. या डेबिट कार्डवर एक लाख रुपये अपघात विमा मोफत दिला जातो. 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यासाठी अपघात विमा वाढवून दोन लाख रुपये केला आहे. यासोबत या डेबिट कार्डवर तीस हजार रुपयांचा लाइफ इन्शुरन्स कव्हर मोफत मिळत आहे. हा विमा 15 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2015 दरम्यान उघडलेल्या खात्यांनाच मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post