फक्त फोटो सेशनसाठी वृक्ष लागवड नाही : सुनंदाताई पवार

 फक्त फोटो सेशनसाठी वृक्ष लागवड नाही 

सुनंदाताई पवार यांचा स्वच्छतेबरोबर ग्रीन सिटी करण्याचा संकल्प 

नगरपरिषदेला दिले साडेपाच हजार झाडे 

  


जामखेड(नासीर पठाण) - शहर स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी बारामती अँग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथून आणलेले विविध प्रकारचे साडेपाच हजार झाडे नगरपरिषदेला सपुर्त केले. सदर झाडे लावले तर वाया जाणार नाही यासाठी खबरदारी घेण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. केवळ फोटोसेशनसाठी झाडे लावली जाणार नाहीत तर ती जगली पाहिजे यासाठी रजिस्टर केले असून कोणी काय केले याचे मुल्यमापन केले जाणार असून झाडे जगली तर शहर हरीत शहर होणार आहे असा सल्ला सुनंदाताई पवार यांनी दिला. 

       आ. रोहीत पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी मागील तीन महिन्या पासून शहरात स्वच्छता अभियान लोकसह भागातून करीत आहेत. सुरवातीला प्रतिसाद कमी मिळाला नंतर नगरपरिषद निवडणूक हालचाल होताच इच्छुकांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांसह सहभाग घेऊन प्रभाग स्वच्छ करण्यासाठी पाऊल टाकले. 

       शहरातील स्वच्छता बरोबर निसर्गाचा समतोल रहावा यादृष्टीने सुनंदाताई पवार यांनी हैदराबाद येथून साडेपाच हजार विविध प्रकारचे झाडे मागीतली शनिवार दि. ६ रोजी डॉ. अरोळे हॉस्पिटल येथे अयोजीत कार्यक्रमात त्यांनी सदर झाडे नगरपरिषद व कार्यकर्ते यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना सुनंदाताई म्हणाल्या एकही झाड वाया जाणार नाही याची खबरदारी प्रशासन व कार्यकर्ते यांनी दखल घ्यावी तुम्ही झाडे घाईगर्दीत लावू नका तयारी करा खड्डे घ्या आणलेले माती व खत टाका मंग झाडे लावा व त्याला जाळी लावा सध्या उष्णता वाढत आहे हलगर्जीपणा करू नका फोटोसेशनसाठी झाडे लावू नका ही झाडे आपल्याला जपायची आहे. पुढचा आणखी स्टॉक येईपर्यंत ही झाडे जगवायची आहे. कोविड काळात डॉ. अरोळे हॉस्पिटलने रात्रभर जागून रुग्णांचे प्राण वाचवले व मृत्यूदर कमी केला त्यांचे ऋण आपण विसरणार नाही. या प्रकल्पात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला आहे व आ. रोहीत पवार यांनी येथे कार्यकर्त्यांसह श्रमदान केले आहे. झाडे कोणी लावले, ते सुरक्षित आहे का ती जगवली की नाही याबाबत स्वतंत्र रजिस्टर केले जाणार आहे व मुल्यमापन केले जाणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post