भारताने मालिका जिंकली, चौथ्या कसोटीत इंग्लंडवर डावाने विजय

 भारताने मालिका जिंकली, चौथ्या कसोटीत इंग्लंडवर डावाने विजयअहमदाबाद :  चौथ्या कसोटीत  टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध एक डाव आणि 25 धावांनी  विजय मिळवलाआहे. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. इंग्लंडचा दुसरा डाव या फिरकी जोडीने अवघ्या 135 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 135 सर्वबाद धावा केल्या. यामुळे इंडियाचा 25 धावा आणि डावाने विजय झाला आहे. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. शतकवीर ऋषभ पंत याने सामनावीर किताब मिळविला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post