येत्या काळात देशात मोठा दुष्काळ...आय.आय.टी. गांधीनगर संशोधकांचा अभ्यास

 येत्या काही वर्षांत मोठा दुष्काळ...आय.आय.टी. गांधीनगर संशोधकांचा अभ्यासमुंबई : जागतिक तापमान वाढ व अन्य कारणांमुळे हवामान बदलले आहे. त्यातच आता भारताच्या दृष्टीने चिंता करायला लावणारा अहवाल आय.आय.टी. गांधीनगरने जाहीर केला आहे.

 येणाऱ्या काही वर्षात भारताला अचानक मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचा  परिणाम पिकांवरही होईल. सिंचनाची मागणी वाढेल पण भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगरमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात हा धोका वर्तवण्यात आला आहे.

अभ्यासानुसार, मातीतील ओलावा मोठ्या गतीने कमी होत आहे. अशावेळी भारतात अचानक मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे येणाऱ्या दुष्काळापेक्षा अचानक पडणाऱ्या दुष्काळामुळे 2 – 3 आठवड्यातच मोठ्या प्रदेशात त्याचा परिणाम जाणवू लागतो. त्यामुळे शेती, पिकांवर त्याचा मोठा परिणाम होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post