'या' कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले नगर पोलिसांचं अभिनंदन


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले नगर पोलिसांचं अभिनंदननगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणात मुख्य संशयित बाळ बोठे याला जेरबंद करण्याची कामगिरी केल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अहमदनगर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट मध्ये लिहीले आहे की,  अहमदनगर गुन्हे शाखा पोलिसांनी आज हैदराबाद येथून यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी बोठेसह ६ जणांना जेरबंद केले आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post