करोनाचा विस्फोट... जिल्ह्यात 'या' गोष्टींवर सक्त निर्बंध

 

करोनाचा विस्फोट, जिल्ह्यात २८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान नवीन निर्बंध, होळी, धूलिवंदन रंगपंचमी साठी नियमावलीनगर : जिल्ह्यात कोविडचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी होळी, धूलिवंदन, रंगपंचमी सणावेळी गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत. दि.२८ मार्च ते  २ एप्रिल या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कोणतेही धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाही.  खाजगी अथवा सार्वजनिक मोकळ्या जागा, सभागृह, हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी गर्दी जमवल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशात देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post