हे तर षडयंत्र... परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणार

 हे तर षडयंत्र... परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणार 

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रसिद्धी पत्रकमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंग  यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते,  असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. सिंग यांच्या आरोपानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. मात्र , अनिल देशमुख यांनी सिंग यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे सगळं काही षडयंत्र असल्याचं म्हटंलय. “सिगं यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. सिंग यांनी आरोप सिद्ध करावेत,” असे थेट आव्हान देत देशमुख यांंनी सिंग यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिलीय. देशमुखांनी काढलेलेल्या प्रसिद्धी पत्रकात हे स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुख यांचे प्रसिद्धी पत्रक

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात एसीपी पाटील यांचा उल्लेख केला आहे. पाटील यांनी पैसे वसुली संदर्भात सगळी माहिती दिल्याचा दावा सिंग यांनी केलाय. पाटील यांच्यासोबत झालेली चॅटिंगसुद्धा सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात तपशीलवार दिली आहे. याच चॅटिंगवर बोट ठेवत देशमुख यांनी अनके प्रश्न उपस्थित केले आहेत. “आपणास आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले. पाटील यांच्याकडून अपेक्षित असलेली उत्तरे सिंग यांनी मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचाच एक भाग होता. या chat च्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?,” असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.


“18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हॉट्सअ‌ॅपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला. पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की, सचिन वाझे आणि  एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे,” असं देशमुख यांनी सांगितलंय.

तसेच, स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणत असतली तर त्याच वेळी त्यांनी हे का सांगितले नाही. एवढे दिवस ते शांत का होते? विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी,” अशी मागणीसुद्धा अनिल देशमुख यांनी केलीये.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post