मोठी बातमी...व्यापारी गौतम हिरण अपहरण व खून प्रकरणातील आरोपी जेरबंद

 व्यापारी गौतम हिरण अपहरण व खून प्रकरणातील आरोपी जेरबंदनगर:  दि‌ ०१/०३/२०२१ रोजी बेलापूर, ता. श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण  अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले होते. व नंतर सिरम यांचा मृतदेह आढळला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर काळजीघेतलेली होती. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी सहा दिवस अहोरात्र मेहनत घेवून तांत्रीक विश्लेषणाचे आधारे काही संशयित इसम निष्पन्न करुन त्यांचेवर लक्ष केंद्रीत करुन प्रथम १) संदीप मुरलीधर हांडे, (वय- २६ वर्षे, रा. माळेगांव, ता- सिन्नर, जिनाशिक) यांस नाशिक येथून ताब्यात घेतले. पुढील तपासामध्ये आरोपी नामे (२) जुनेद उर्फ जावेद बाबु शेख (वय२५ वर्षे, रा. सप्तश्रृंगीनगर, नायगांव रोड, सिन्नर जि. नाशिक), (३) अजय राजू चव्हाण (वय २६ वर्षे रा.पास्तेगांव, मारुती मंदीरासमोर, सिन्नर, जि. नाशिक) (४) नवनाथ धोंडू निकम,( वय- २९ वर्षे, रा. उक्कडगांव,ता- कोपरगांव, जि- अहमदनगर)व एक २२ वर्षीय आरोपी यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाबेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.

 आरोपींकडून मयत गौतम हिरण यांचा रियल-मी कंपनीचा मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती व्हॅन (क्रं.  एमएच-१५-जीएल-४३८७) असा मुद्देमाल भारतीय पुरावा कायदा कलम २७ प्रमाणे जप्त केलेला आहे.

पुढील तपास श्री. संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके व त्यांचे पथकातील सपोनि/मिथून घुगे, पोसई/गणेश इंगळे, सफौ/ सोन्याबापु नानेकर, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, संदिप घोडके, विश्वास बेरड, पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, सचिन आडबल, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक शिंदे, विशाल गवांदे,पोकॉ योगेश सातपूते, संदीप दरंदले, रविन्द्र शृंगासे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, मयूर गायकवाड,मेघराज कोल्हे, राहूल सोळंके, रोहीत येमूल, आकाश काळे, चालक हेकॉ. उमाकांत गावडे पोना/भरत बुधवंत,अर्जून बडे, चा. पोहेकॉ/बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूरसायबर सेल येथील पोना फुरकान शेख, पोकॉ प्रमोद जाधव यांनी केलेली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post