तुमच्या मुख्यमंत्रीपदासाठी मी माझी आमदारकी धोक्यात आणली, मला आता मंत्रीपद द्या

 तुमच्या मुख्यमंत्रीपदासाठी मी माझी आमदारकी धोक्यात आणली, मला आता मंत्रीपद द्या

हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई: संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाले असून त्यासाठी आता हरिभाऊ राठोड यांनी कंबर कसली आहे. संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून त्यासाठी त्यांनी दोन पत्रंही लिहली आहेत. हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असतं असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post