हरभजनसिंगची नवीन इनिंग, मुख्य भूमिकेत दिसणार 'या' चित्रपटात

 हरभजनसिंगची नवीन इनिंग,  चित्रपटातून करणार अभिनयात एंट्रीभारतीय संघाचा ऑफ ब्रेक स्पिनर हरभजन सिंग आता नवीन भूमिकेत पहायला मिळणार आहे. हरभजन सिंग आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आला आहे. नुकताच हरभजन सिंगच्या 'फ्रेंडशिप'चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच 1 मार्च रोजी रिलीज झाला. या टीझरला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. टीझरमध्ये हरभजन सिंगची वेगवेगळी पात्रं दिसली आहेत, ज्यात तो कधी फायटींग, नाचताना तर कधी दमदार अभिनय करताना दिसतोय. चित्रपटाच्या एका सीनमध्ये त्याच्या हाथी क्रिकेट बॉलही दिसत आहे. हरभजन सिंगचा हा चित्रपट दक्षिणेत बनविला गेला असून तो हिंदीमध्ये डब केला जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post