नगर तालुक्यात मोठी राजकीय घडामोड...माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ राष्ट्रवादीच्या वाटेवर

 

 माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ यांचा राष्ट्रवादीत प्रवेशनगर : नगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व नगर तालुक्यातील बडे प्रस्थ बाळासाहेब हराळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.  आज राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत हराळ यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, घनशाम शेलार आदी उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या राजकारणात हराळ हे विखे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा घेतलेल्या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post