स्थायी समिती सभापतीपदी अविनाश घुले बिनविरोध, शिवसेनेची आघाडी धर्मासाठी पुन्हा माघार

स्थायी समिती सभापतीपदी अविनाश घुले बिनविरोध, शिवसेनेची आघाडी धर्मासाठी पुन्हा माघारनगर: नगर महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाली.  शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे सांगितले. 

स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजप-राष्ट्रवादी आघाडीचे अविनाश घुले आणि शिवसेनेचे विजय पठारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.  

स्थायी समितीत सोळा सदस्य असून, त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे प्रत्येकी पाच, भाजपचे चार आणि काँग्रेस, बसपचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. 16 पैकी 13 सदस्य उपस्थित होते. तर शिवसेनेचे प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, शाम नळकांडे हे अनुपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post