चंद्रशेखर घुले पाटील यांनी नेहमीच इतरांना मोठं केलं

चंद्रशेखर घुले पाटील यांनी नेहमीच इतरांना मोठं केलं, सभापती क्षितीज घुले यांची भावनानगर - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नाव आघाडीवर असताना अचानक शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी कडुन ॲड. उदय शेळके यांचे नाव पुढे आले व अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. अर्थात यासाठी घुले यांनीही संमती दिली व पक्षाचा आदेश मान्य केला. यानंतर शेवगावचे सभापती क्षितीज घुले पाटील यांनी लिहीलेली फेसबुक पोस्ट घुले समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. क्षितीज घुले यांनी लिहिले आहे की, 

मा. आ. चंद्रशेखर घुले पाटीलांनी ईतरांना मोठे केले असे हजारो उदाहरणे आज दिली तरी कमी पडेल. दुसर्याच्या मोठेपणात आपला मोठेपणा हाच भाऊंचा स्वभाव आज नगर जिल्ह्याने अनुभवला King is king 👑👑 ✌️✌️⏰⏰

 


चंद्रशेखर घुले यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे तिकीट निश्चित असताना प्रताप ढाकणे यांना उमेदवारी देण्याह्स संमती दिली होती. दुर्दैवाने ढाकणे यांचा पराभव झाला पण घुले यांनी आपली संपूर्ण ताकद ढाकणे यांच्यासाठी लावली होती. आताही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असताना त्यांनी सहजपणे पक्षादेश स्विकारला. याचीच आठवण क्षितीज घुले यांनी अप्रत्यक्षपणे करून दिल्याची चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post