वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 1 एप्रिल पासून वीज दर कमी

 वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 1 एप्रिल पासून वीज दर कमी



मुंबई :   1 एप्रिल 2021 पासून वीज दर सुमारे 2 टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात एकीकडे इंधन दरवाढ होत आहे तर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी (इंधन समायोजन कर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आले.


एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020 मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याची सुरुवात झाली. मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, इंडस्ट्रीसाठी 10 टक्के वीज दर कमी करण्यात आले. तर या वर्षी 1 एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post