मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावे, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

 मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावं: देवेंद्र फडणवीसमुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऊस उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी ट्विट करीत ऊस उत्पादकाने जाळलेल्या ऊसाचे फोटो व व्हिडिओ शेअर केले आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला व मुळा कारखान्याकडून शेतकर्यांच्या होणार्या तळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

फडणवीस यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की,

मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला कंटाळून 19 फेब्रुवारी रोजी एका शेतकर्‍याने उस पेटविल्यानंतर आज आणखी एका शेतकर्‍याने आपल्या शेतातील उस पेटवून दिला.

घाम गाळून कष्ट घेणार्‍या शेतकर्‍याला हाती आलेलं पीक पेटवून देताना काय वेदना झाल्या असतील
Red question mark ornament


अनेक राज्य आणि राष्ट्रांचा भाषणप्रवास करणारे मा. मुख्यमंत्री किमान एकदा तरी मुळा साखर कारखान्याकडून होणार्‍या छळावर बोलणार का? आपले मंत्री बाहेर काय उत्तर देतात, तेही कृपया ऐका एकदा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post