आ.लंके यांचा वाढदिवस, 'या' गावात दीड लाखांच्या शालेय साहित्याचे वाटप

 

आ.लंके यांचा वाढदिवस, अकोळनेरला दीड लाखांच्या शालेय साहित्याचे वाटपअहमदनगर : - गरजवंत मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा शक्ती असते मात्र पारिस्थती आडवी येते . ग्रामीण भागातील गरीब विदयार्थीना शैक्षणिक मदत केली पाहिजे . या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर  उच्च पदावर जातील. गरीब मुलांना मदत करणे हे सर्वात पुण्याचे काम आहे असे प्रतिपादन आ.निलेश लंके यांनी केले

अकोळनेर ( ता. नगर ) येथे उपसरपंच प्रतिक शेळके यांनी आ. लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील गरजवंत दोनशे विदयार्थना दिड लाख रूपयाचे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गारुडकर होते. यावेळी सरपंच दादा कोळगे उपसरपंच प्रतिक शेळके , पंचायत समिती माजी सभापती नंदाताई शेंडगे ,भगवान भोर,सतिश गायकवाड ,राजेंद्र गावखरे, युवराज कार्ले, प्रविण कोठुळे, राजेंद्र शेळके,आदिनाथ गायकवाड , अंकुश रोकडे , लक्ष्मण ठोकळ, राहुल आढाव, बाबासाहेब जाधव , चंद्रकांत मेहत्रे, बाळासाहेब भोर , विदया भोर , मुख्याध्यापक सदाशिव साबळे ,प्रा. विजय गायकवाड , युवराज गारुडकर, बापु साहेब मेहत्रे, शितल शिंदे, वंदना गायकवाड, सुवर्णा सोनवणे , मनिषा पवार उपस्थित होते .यावेळी लंके म्हणाले मतदार संघातील अकोळनेर गाव मी दत्तक घेतले असून पाच वर्षात गावाचा पुर्ण विकास करणार आहे . प्रतिक शेळकेने उपसरपंच पदाची सुत्र हातात घेतात गरजवंत मुलांना शेक्षणिक साहित्य देऊन चांगल्या कामाची सुरवात केली आहे. येथील नागरिकासाठी सत्तर लाख रुपयाचे मंगल कार्यालय उभारणार आहे .मी आमदार असलो तरी एक साधा कार्यकर्ताच राहणार आहे असे या वेळी म्हणाले . या कार्यक्रमासाठी प्रंशात मेहत्रे, राजेंद्र कोळगे, दादा धस , प्रदिप कोळगे , रामचंद्र जाधव , आबा सोनवणे, अर्जुन सोनवणे , अरुण जाधव , कैलास जाधव , अनिल मेहत्रे, कैलास टुमकर , किशोर जाधव यावेळी उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post